Just another WordPress site

कोंडीने त्रासलेल्या पुणेकरांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा

वाहतुक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांना विचारला जाब, पहा व्हिडिओ

पुणे दि २७ (प्रतिनिधी) – पुणेकरांना रोजच चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सरकार दरबारी गा-हाणे मांडुनही समस्या सुटत नसल्याने पुणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांदणी चाैकातच ताफा अडवत वाहतूक कोंडीची समस्या मांडली. अखेर लवकरच कार्यवाही करु अस उत्तर देत एकनाथ शिंदेनी तेथून काढता पाय घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याची चांदणी चौकातील हायवेवरुन साताऱ्याला जात होते. त्यावेळी चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफादेखील वाहतूक कोंडीत अडकला होता. चांदणी चाैकसत आणि पुणे शहरात सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी शिंदेना गाठत आपले गा-हाने मांडले आहे. ‘या वाहतूक कोंडीवर मार्ग काढा. काहीतरी ठोस नियोजन करा. या मार्गावर तासंतास वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असतात, यावर तोडगा काढा,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यापुर्वी देखील पुणेकरांनी पुणे प्रशासनाकडे या वाहतूक कोंडीचं गाऱ्हाणं मांडलं होतं. मात्र याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने पुणेकरांनी थेट मुख्यमंत्र्यांना गाठलं आहे. चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम सुरू आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांनी या वाहतूक कोंडीवरत तोडगा काढण्याचा आदेश दिला आहे.

GIF Advt

 

खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वारंवार नितिन गडकरींकडे वाहतूक किंडीची समस्या मांडली आहे. पण पुणेकरांनी मुख्यमंत्र्याचा ताफा अडवत केलेल्या मागणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने तरी वाहतूक कोंडीची समस्य सुटणार का?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!