Latest Marathi News
Ganesh J GIF

पत्नीला फूस लावून पळवून नेणाऱ्याचा घरात घुसून निर्घृण खून

हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, जिवलग मित्र या कारणामुळे बनले कट्टर दुश्मन, एकजण गंभीर जखमी, टोळीयुद्धाचा भडका

कोल्हापूर – पत्नीला पळवून नेणाऱ्याचा घरात घुसून खून केल्याची घटनेने कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे. फुलेवाडी रिंग रोड परिसरातील गंगाई लॉनजवळ शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महेश राजेंद्र राख असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आदित्य गवळी याच्या बायकोला महेश राख याने फूस लावून पळवून नेले होते. यावरून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आदित्य गवळी आणि सिद्धांत गवळी हे दोघे सख्खे भाऊ आपल्या मित्रांना घेऊन महेश राख त्याच्या घरी गेले. घरावर दगड आणि बियरच्या बाटल्या फेकत ते घरात घुसले, आणि हल्ला चढवला. या हल्ल्यात महेशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र विश्वजीत फाले गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींनी महेशच्या मित्राच्या घरावरही बिअर बाटल्या आणि दगडफेक करून नुकसान केले. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करवीर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, ‘महेश राख याच्या खुनामागे वैयक्तिक सूड असल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपी आदित्य गवळी आणि महेश राख यांच्यात गवळीच्या पत्नीवरून वाद होता. महेशने तिला घरी आणून तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. याच कारणावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले होते. याच वैमनस्यातून आदित्य गवळी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मध्यरात्री हा हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. राख आणि गवळी हे सराईत गुन्हेगार असल्यामुळे शहरात पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली आहे.

 

पोलिसांनी सिद्धांत शशिकांत गवळी, आदित्य शशिकांत गवळी, धीरज शर्मा, ऋषभ साळोखे-मगर, मयूर कांबळे, पियुष पाटील, सद्दाम कुंडलेसह एका अनोळखीवर गुन्हा दाखल केला आहे. पण या हल्ल्यामुळे कोल्हापूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!