Latest Marathi News
Ganesh J GIF

विवाहिते महिलेने नाव बदलत केले तरुणाशी खोटे लग्न

तरुणाला घातला लाखो रूपयांचा गंडा, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

महाराष्ट्र – महाराष्ट्रात सध्या फसवणूक प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच लग्नाळू तरुण अनेकांचे सावज होत आहेत. अशातच सांगलीत खोटं लग्न करून महिलेने एका तरुणाला लाखो रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

पहिले लग्न झालेले असतानाही कोल्हापूर येथील एका विवाहितेने सांगलीतील तरुणाशी दुसरे लग्न केले. लग्नासाठी तिने स्वतःचे नावही बदलले होते. खोटे लग्न करून तिने तरुणाला तब्बल दीड लाखाचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांच्या टोळीला अटक केली आहे. पल्लवी मंदार कदम (मूळ नाव : परवीन मोदीन मुजावर. रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर), एजंट राणी ऊर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार (रा. पंचशीलनगर), राधिका रतन लोंढे (रा. लोंढे कॉलनी, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, मिरज), सुमन दयानंद वाघमारे (रा. वैरण बाजारजवळ, मिरज) अशी संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण खासगी नोकरी करतो. संशयित चार महिलांसह नाईकबाई नावाच्या आणखी एका महिलेने संगनमत करून पल्लवी कदम ऊर्फ परवीन मुजावर हिचे पहिले लग्न झालेले असतानाही या तरुणाशी दुसरे लग्न लावून दिले. याकरिता तरुणाकडून दीड लाख रुपये घेतले. ते संशयितांनी वाटून घेतले. पल्लवीचा पती मंदार जिवंत असताना तसेच तिचा धर्मही संशयितांनी लपवून ठेवला. काही दिवसांनी तरुणाला या टोळीच्या कारनाम्याची माहिती मिळाली. त्याने संजयनगर पोलिस ठाण्यात टोळीविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. फसवणुकीची ही घटना ९ सप्टेंबर २०२४ ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत घडली आहे.

महाराष्ट्रात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मध्यंतरी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील एका तरुणाने याप्रकरणी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली होती. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी करिष्मा हसन सय्यद आणि तिच्या साथीदार महिलांना अटक केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!