(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – एकतर्फी प्रेमातून तरूणाने वर्षभर त्रास दिल्याने बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.
आरोपी तरूण गेल्या वर्षभरापासून पीडित तरूणीला त्रास देत होता, ब्लॅकमेल करत होता अशी माहिती समोर आली आहे. तसेच तो तिला आत्महत्येची देखील धमकी देत होता. याच त्रासातून, ताणातून सुटका मिळवण्यासाठी त्या मुलीने टोकाचं पाऊल उचलत आयुष्यच संपवलं. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी गावातून शहरात बीएचएमएसचे शिक्षण घेण्यासाठी आली होती. ती शहरातील वैद्यकीय कॉलेजमध्ये बी.एच.एम.एसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. मात्र तिच्या गावातील एक तरूणच तिला गेल्या वर्षभरापासून त्रास होता. ‘माझ्याशी मैत्री कर, मला भेटायला ये’ असे तो तिला सतत सांगायचा. एवढंच नव्हे तर ‘माझ्यासोबत बोल , माझ्यावर प्रेम करा,अन्यथा मी आत्महत्या करेन’ अशी धमकीही त्याने त्या तरूणीला दिली होती.
गेल्या वर्षभरापासून हा प्रकार, त्रास सुरू होता. त्यामुळे ती तरूणी खूप त्रासली होती. तिला मानसिक त्रास होता, ती घाबरली आणि भीतीपोटी तिने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. याप्रकरणी आता मुलीच्या मावशीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला एम.सिडको पोलिसांनी त्याला अटक केली. शिवाय ३ दिवस पोलीस कोठडी देखील त्याला सुनावलेली आहे.