Latest Marathi News
Ganesh J GIF

एका तरुणीच्या आत्महत्येला तिची मैत्रिणीच ठरली कारणीभूत

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – साताऱ्यात एका तरुणीने स्वत: ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय घेण्यामागील कारण समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. एका जवळच्या मैत्रिणीमुळेच तिला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.

सुरुवातीला संबंधित घटना ही एक आत्महत्येची घटना वाटत होती. पण तरुणीच्या आत्महत्येमागील नेमकं कारण काय असावं? असा प्रश्न उपस्थित होता. तरुणीचं वैयक्तिक आयुष्य, कुटुंब सर्व व्यवस्थित होतं. असं असताना तिने आत्महत्या का केली असावी? असा प्रश्न तिच्या कुटुंबियांकडूनही उपस्थित करण्यात येत होता. अखेर या आत्महत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांच्या तपासात या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

साताऱ्याच्या तरुणीच्या आत्महत्येला तिची मैत्रिणीच कारणीभूत ठरल्याचं समोर आलं आहे. तिच्या मैत्रिणीने मस्करी करण्यासाठी एका मुलाच्या नावाचं अकाउंट उघडलं होतं. तिने स्वत:च्याच मैत्रिणीला फ्रेंड रिकवेस्ट पाठवली. यानंतर संबंधीत मुलीनं ही रिकवेस्ट एक्सेप्ट केली. नंतर ही मुलगी रिकवेस्ट पाठवणऱ्या मनिष नावानं बनावट अकाऊंट असणाऱ्याच्या प्रेमात पडली. मात्र मनिषला भेटण्याचा आग्रह मैत्रीण करु लागल्यावर तिच्या मैत्रिणीची चांगलीच पंचायत झाली.

यानंतर मैत्रिणीची फसवणूक करणाऱ्या तरुणीने शिवम पाटील नावाने दुसरं अकाऊंट बनवत मनिष मृत झाला असल्याचं सांगितलं. तिला मनिषचे दवाखान्यातील नकली फोटो देखील पाठवले. यामुळे तिच्या २४ वर्षीय मैत्रिणीला हा धक्का सहन झाला नाही. तिने विरहातून गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना १२ जूनला घडली. यानंतर पोलिसांत ही नोंद अकस्मात मृत्यू म्हणून झाली होती. मात्र पोलिसांनी याचा तपास केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित मैत्रिणीने हा सर्व प्रकार इंस्टाग्रामच्या माध्यमातून घडवून आणल्याचं लक्षात आल्यानंतर मृत मुलीच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. या घटनेची नोंद वाठार पोलीस ठाण्यात झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!