Latest Marathi News
Ganesh J GIF

महावितरणमधील अभियंता तरुणीची गळफास घेत आत्महत्या

आत्महत्येआधी सुसाईड नोट लिहित संपवले आयुष्य, अभिलाषाच्या टोकाच्या निर्णयाने खळबळ

रायगड दि २१(प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिलाशा अभिमन्यू शेळके असे या तरुणीचे नाव असून ती महावितरण कार्यालयात कार्यरत होती. कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मृत अभिलाषा शेळके गोरेगाव येथील कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत होती. महावितरणच्या गोरेगाव येथील वसाहतीत ही युवती एकटीच राहत होती. शुक्रवार १९ मे रोजी अभिलाशा हिने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. गोरेगाव पोलिस ठाणे येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्येच्याआधी तरुणीने एक चिठ्ठी लिहिली असून ती गोरेगाव पोलिसांनी जप्त केली आहे. “माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये. हा निर्णय मी स्वतःहून घेतला आहे”, असं तीने आपल्या आई – वडिलांच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उभारे करत आहेत. तिने असा टोकाचा निर्णय का घेतला याची सध्या उकल केली जात आहे.

अलीकडे युवा पिढीमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण हे वाढायला लागलं आहे. त्यातच आता मुळची छत्रपती संभाजीनगरची असलेल्या अभिलाषाने टोकाचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!