लग्न करू नका मित्रांनो म्हणत तरुणाची आत्महत्या
आत्महत्येपुर्वी सुसाईड नोट लिहित पत्नी, सासू आणि मेव्हणीवर गंभीर आरोप, सरकारकडे ही विनंती
इंदोर- मध्य प्रदेशात बंगळुरूच्या अतुल सुभाषच्या आत्महत्या प्रकरणासारखीच घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि सासरच्यांच्या त्रासाला कंटाळुन पतीने आत्महत्या केल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने दोन पत्र लिहली होती.
नितीन पडियार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नितिनने एक पत्र आईसाठी तर दुसरे पत्र मित्रासाठी लिहले होते. या पत्रात त्याने तरूणांना लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भारत सरकारकडे महिला कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे. नितीनच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नितिन आणि वर्षा शर्मा दोघांनीही आर्य समाज परंपरेनुसार प्रेमविवाह केला होता. लग्नाला ६ वर्षे झाली होती. त्याचवेळी, मुलगी आणि तिचे कुटुंब सतत हुंडा परत करण्याबद्दल बोलत होते. लग्न आर्य समाज परंपरेनुसार झाले असल्याने हुंडा घेण्यात आला नाही. तसेच ती मुलगी नितीनवर वेगळे राहण्यासाठी सतत दबाव आणत होती. पत्नीने केलेल्या आरोपामुळे तसेच नितीनच्या आईला आणि मोठ्या भावाला हुंडा घेण्याच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर सत्य बाहेर आल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. पण त्यामुळे नितिन तणावात होता. तसेच पत्नीने त्याच्याकडे २० लाखाची मागणी केली होती. याच कारणामुळे बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या नितीन पडियारने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीनने लिहिलेल्या पत्रात मित्रांना लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने हुंड्डा बंदी कायद्यात बदल करावा, महिला त्याचा गैरवापर करत आहेत, अशी विनंती केली आहे.
नितीन पडियार यांनी त्याच्या आत्महत्येसाठी पत्नी वर्षा शर्मा, सासू सीता शर्मा आणि वहिनी मीनाक्षी यांना जबाबदार धरले आहे. पोलिसांनी तरूणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सूरू केला आहे.