Latest Marathi News
Ganesh J GIF

पावसात छतावर रील बनवत होती तरुणी; अचानक तिथेच वीज पडली अन्..

पावसाळ्यात विजांचा कडकडाट होणं सामान्य आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेकदा वीज पडल्याच्या घटनाही समोर येतात. त्या अनेकदा झाडावर किंवा एखाद्या खांबावर पडतात. मात्र, या नैसर्गिक घटनेपासून शहरं वाचतात असंही काही नाही.शहरांमध्येही विजेचा कडकडाट होत असताना अशी अनेक प्रकरणं पाहण्यात आली आहेत. नुकताच एक होत आहे, जो शहरातील आहे पण अतिशय धक्कादायक आहे.

यात एक तरुणी पावसात छतावर रिल बनवत होती. इतक्यात अचानक एवढी जोरदार वीज आकाशातून पडली, की तरुणी घाबरली आणि घराच्या आत पळाली. लोक या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत. नुकताच असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात एक मुलगी पावसात भिजताना नाचत आहे आणि रील बनवत आहे. मात्र, पुढच्याच क्षणी इथे काय होणार आहे, याची तिला कल्पनाही नव्हती. जर वीज मुलीच्या दिशेने पडली असती तर तिला नक्कीच जीव गमवावा लागला असता.

हा व्हिडिओ बिहारच्या सीतामणीचा आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की मुलगी टेरेसवर डान्स करत आहे. तिने कॅमेरा दूर ठेवला आहे. काहीच वेळात थोड्याच अंतरावर छतावर जोरदार वीज पडते. मोठा आवाज होताच मुलगी आत पळते. या व्हिडिओला 5 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.एकजण म्हणाला – फक्त रील बनवण्याच्या नादात फोटो फ्रेममध्ये कायमचे कैद होऊ नका. एकजण म्हणाला- भगवान इंद्रही टाळी वाजवत आहेत! एकाने म्हटलं, की मुलगी खूप भाग्यवान आहे कारण मेटल पाईप आणि स्पाइकमुळे वीज तिकडेच पडली. एकाने म्हटलं, की कदाचित निसर्गालाही रील बनवणं आवडत नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!