Latest Marathi News
Ganesh J GIF

दिल्ली महापालिकेत आपचा भाजपाचा पराभवाचा दणका

भाजपाच्या दीड दशकाच्या सत्तेला सुरंग, काँग्रेसला एवढ्या जागी यश

दिल्ली दि ७(प्रतिनिधी)- देशात मोदींची भाजपा दणदणीत यश मिळवत असताना दिल्लीत मात्र अपयशी ठरत आहेत. देशातील मातब्बर पक्षांना नामोहरण करणाऱ्या भाजपाला पुन्हा एकदा दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने धोबीपछाड देत दिल्ली महापालिकेची सत्ता हस्तगत केली आहे. गेल्या १५ वर्षापासून सत्तेत असणा-या भाजपाचा पराभव झाला असून काँग्रेसला आपले अस्तित्वही राखता आलेले नाही.

दिल्ली महानगरपालिकेच्या बहुचर्चित निवडणुकीत ‘आप’ने २५० पैकी १३१ जागा जिंकत या पालिकेतील भाजपची १५ वर्षांची सद्दी संपुष्टात आणली आहे. केजरीवालांच्या पक्षाने बहुमतासाठी लागणारा १२६ चा आकडा ओलांडल्यामुळे आता दिल्ली महानगरपालिकेत ‘आप’ची पूर्ण बहुमताने सत्ता असेल. तर नेहमीप्रमाणे प्रचारात आपली संपूर्ण ताकद झोकून देऊन लढणाऱ्या भाजपने एक्झिट पोल्सचा अंदाज चुकवत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवले आहे. भाजपने ९९ जागांवर विजय मिळवला असला तरीही त्यांना सत्ता राखण्यात अपयश आले आहे. तर एकेकाळी दिल्लीत दबदबा असलेल्या काँग्रेस पक्षाला अवघ्या ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. पूर्व दिल्लीत एकूण ७७ जागा आहेत. यापैकी २६ जागांवर आम आदमी पक्ष, ४२ जागांवर भाजप आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार ८ जागांवर विजयी झाले. तर आऊटर दिल्लीतील एकूण ११८ जागांपैकी ७४ जागांवर आप, भाजप ४०, काँग्रेस आणि अन्य पक्षांना प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळाला. तर दक्षिण दिल्लीत ‘आप’ने ३४ जागांवर विजय मिळवला. तर भाजपला फक्त २१ जागा मिळाल्या. दक्षिण दिल्लीत काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळाला नाही.

दिल्ली महानगरपालिकेचे एकत्रीकरण झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीत जनता नेमकी कोणाच्या बाजूने कौल देणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर आम आदमी पक्षाने भाजपची १५ वर्षांच्या सत्तेला सुरंग लावत सत्ता हस्तगत केली आहे. या निकालानंतर ‘आप’च्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!