Just another WordPress site

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे या महिला नेत्यासोबत साटेलोटे

महिला नेत्याच्या पीएचा आरोप, कारवाई न केल्यास दिला आत्मदहनाचा इशारा

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि वाद हे समीकरणच तयार झाले आहे आता ते पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. याहेवेळी ते एका महिला नेत्यामुळे वादात सापडले आहेत. एका महिला नेत्याचे माजी पीएने पत्रकार परिषद घेत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दीपाली सय्यद यांचे साटेलोटे असल्याचा आरोप केला आहे.

दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. दीपाली सय्यद यांनी अनेकांना बोगस लग्नांच्या माध्यमातून कोट्यवधींचा गंडा घातल्याचा मोठा आरोप शिंदेंनी केला आहे.ते म्हणाले “दीपाली सय्यद ट्रस्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये हडपण्यात आले आहेत. ट्रस्टच्या खात्यात फक्त नऊ हजार मग कोट्यवधी रुपये आणले कोठून आणि कोणाला दिले असा प्रश्न उपस्थित केला. शिंदे यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही लक्ष्य केले आहे. ९ सप्टेंबर २०२१ रोजी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली.’ त्यांनी २०१६ लग्न झालेल्या एका दाम्पत्याचे उदाहरण दिले. या दाम्पत्याला २०१८ मध्ये मुलही झालं, तरी कोश्यारी आणि सय्यद यांनी पुन्हा चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत त्यांचे लग्न लावले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दीपाली सय्यद यांचे साटेलोटे असून दिपाली सय्यद यांचे दुबई आणि पाकिस्तान ही कनेक्शन आहे. त्यामुळे राज्यपाल यांना पदावरून लवकर हटवावे अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

GIF Advt

दीपाली सय्यद यांच्यावर राज्यपाल एवढे का मेहरबान आहेत? याची चौकशी व्हावी अशी मागणी करताना ‘मी राज्याच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की आठ दिवसात जर या चॅरिटेबल ट्रस्टची चौकशी झाली नाही तर मी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आत्मदहन करेन.असा इशारा दिला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!