
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण
पुणे विमानतळ परिसरातून अपहरण, पोलीसांकडून तपास सुरु, काही दिवसापूर्वी देण्यात आली होती धमकी
पुणे – शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून सावंत यांच्या मुलाचा शोध घेतला जात आहे. पण या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
तानाजी सावंत याचे पुणे विमानतळ परिसरातून अपहरण करण्यात आले आहे. यानंतर, पोलिस नियंत्रण कक्षाला अपहरणाची तक्रार मिळाली. त्यांचा मुलगा बेपत्ता झाल्यानंतर, तानाजी सावंत ताबडतोब विमानतळावर पोहोचले. सिंहगड पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नर्हे परिसरातून सायंकाळी पाच वाजता वाजता स्विफ्ट कारमधून त्याचे अपहरण करण्यात आल्याचे समजत आहे. पुण्यातील कात्रज परिसरातील तानाजी सावंत यांच्या घरी पोलिसांचे पथक पोहोचले आहे. घरी कोणाचा फोन आला होता का किंवा खंडणी मागितली गेली होती का?, याचा तपास पोलिस करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, स्विफ्ट कारमधून चार जणांनी उतरून तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण केले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपास सुरू केला आहे. काही दिवसापूर्वी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना देखील तुमचा देखील संतोष देशमुख करू अशी धमकी देण्यात आली होती. तेरणा साखर कारखान्यासाठी उस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाकडे बंद पाकीटमध्ये १०० रूपयांच्या नोटेसोबत ही धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे. अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पण पोलिसांनी देखील आपल्याकडे कोणतेही तक्रार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. याच बरोबर सावंत कुटुंबियांनी देखील याबाबत कोणतीच फिर्याद दिली नसल्याची माहिती पुढे येत आहे.