
पोलीस स्टेशनसमोर पोलिसाच्या तावडीतून आरोप पळाला
आरोपी पळून जातानाचा थरार सीसीटीव्हीत कैद, आरोपीवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप, पुढे काय झाले?
हमीरपूर – पोलीस आणि गुन्हेगार यांचे धापा मुंगसासारखे सख्य असते. त्याचप्रमाणे आपण अनेकवेळा सिनेमात पाहिले असेल की आरोपी अनेकदा पोलीसांच्या तावडीतून सुटण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका आरोपीने पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.
हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. जो आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे. त्याने एका वृद्धावर हल्ला केला होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले होते. कमाल म्हणजे आरोपी अल्पवयीन आहे. गाडी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर आरोपीने शेजारील पोलिसाला लघवीला जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस आधी उतरले नंतर आरोपी उतरला. पण यावेळी आरोपीने दोन तीन पावले चालल्यानंतर तेथून पळ काढला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पोलीस उतरल्यानंतर आरोपी उतरतो. दोन-तीन पावलं चालतो आणि पळत सुटतो. पायातील चपला निघतात आणि त्याचा तोल जातो. पण, तोल सावरून तो पळत सुटतो. त्यानंतर गाडीतील पोलीस आणि पोलीस ठाण्यातील पोलीस त्याच्या मागे धावतात. काही वेळ पाठलाग केल्यानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले, सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
अल्पवयीन आरोपी आणि त्याचा साथीदार केशव शर्मा या दोघांनी एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या करण्याचा प्रयत्न केला. केशव शर्माला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.