Latest Marathi News
Ganesh J GIF

पतीची हत्या करुन महिलेचा प्रियकरावर बलात्काराचा आरोप

मोबाईलमधील ते व्हिडिओ मुलीने पाहिल्यानंतर महिलेने काढला पतीचा काटा, प्रियकरालाही अडकवले पण...

गुरुग्राम – देशात अलीकडे अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यातूनच पतीची हत्या करण्यात आल्याचेही दिसून आले आहे. आता गुरुग्राममध्ये पतीला अनैतिक संबंध समजले तर कठीण होऊ शकते अशी भीती वाटल्याने प्रियकराच्यासाथीने पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

गुरुग्राममध्ये विक्रम आपली पत्नी सोनीदेवीसोबत राहत होता. त्यांना एक मुलगीही आहे. पण मागील काही दिवसापासून सोनीचे घराशेजारील रवींद्र बरोबर प्रेमसंबंध होते. त्यांनी दोघांचे एकत्र व्हिडीओ बनवले होते. एके दिवशी मुलीने आईचे ते व्हिडिओ पाहिले. त्यामुळे जर मुलीने हा प्रकार वडिलांना सांगितला तर अवघड होईल या भीतीने रवींद्रला आपल्या पतीची हत्या करण्यास सांगितले. २६ जुलैरोजी तो कामावरून परत येत असताना रवींद्रने आपल्या मित्रांच्या सहाय्याने विक्रमचे अपहरण करुन खून केला. पण सोनीने पोलीसात पती हरवल्याची तक्रार देताना रवींद्रने आपल्यावर बलात्कार केल्याचा खोटा दावा केला.  मार्च २०२४ मध्ये जेव्हा पती बाहेर गेले होते तेव्हा रवींद्रने माझ्यावर बलात्कार केला आणि पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. रवींद्रने व्हिडिओ बनवला होता आणि हे कुणाला सांगितले तर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं सोनीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीसांनी रवींद्रला ताब्यात घेऊन चाैकशी केली. तेव्हा रविंद्रने सांगितले की तो भाड्याने गाड्या बुक करतो आणि त्याचे सोनीशी अवैध संबंध होते. पण त्याला भीती होती की त्यांचे हे प्रकरण उघडकीस येईल. समाजात बदनामी होईल आणि घर तुटेल म्हणून दोघांनी विक्रमपासून सुटका करून घेण्याची योजना आखली. पण सोनी देवीने रवींद्रवर बलात्काराचा आरोप केल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला.

विक्रमच्या हत्येच्या प्लानमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून दोघांनी बॉलिवूड चित्रपट दृश्यम आणि क्राइम पेट्रोलचे अनेक भाग वारंवार पाहिले. त्यांना प्रत्येक ती चूक टाळायची होती. पण अखेर पोलिसांनी या प्रकरणी महिलेसह ५ पुरुषांना अटक केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!