प्रेयसीवर बलात्कार होऊनही आरोपी मोकाटच
मंत्रालयात आलेल्या तरूणाने उचलले टोकाचे पाऊल, व्हिडिओ व्हायरल
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मंत्रालायत एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुरूवातीला तो शेतकरी असल्याचा अंदाज वर्तववण्यात आला होता. पण त्यानंतर उडी मारण्याइतके टोकाचं पाऊल उचलले त्याला कारणही तितकच गंभीर असल्याचे दिसून आले. प्रेयसीवर बलात्कार झाल्यानंतर आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून तरुणाने तणावातून हे पाऊल उचलल आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
बापू नारायण मोकाशी असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने धक्कादायक दावा केला आहे. आपल्या प्रेयसीवर बलात्कार झाला आहे. मी या प्रकरणात उद्धव ठाकरे यांना चार पत्र लिहिली होती, मात्र काहीच झालं नाही असा दावा या तरुणाने केला आहे. मंत्रालयात हा प्रकार घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते. मंत्रालयाला लावलेल्या संरक्षण जाळ्यांमुळे या तरुणाचा जीव वाचला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. या तरुणाने यावेळी आपल्या घरच्यांवर देखील आरोप केले आहेत. मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालयात आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रकार समोर आला आहे.
तरुणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारली मात्र मंत्रालयात लावलेल्या संरक्षक जाळीमुळे या तरुणाचा प्राण वाचला आहे. हा तरुण संरक्षक जाळीत अडकला. या घटनेत तरुणाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.