Latest Marathi News
Ganesh J GIF

शरद पवारांच्या राजीनाम्यावर कार्यकर्ते इरेलाच पेटले

जनतेच्या मनातील राजे म्हणत शरद पवारांना कार्यकर्त्यांचे साकडे, पवार निर्णय बदलणार?

पुणे दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात एकच वादळ आले आहे. पण कार्यकर्त्यांनी मात्र याला विरोध केला आहे. पण पवारांनी आपला निर्णय न बदलल्याने कार्यकर्ते देखील इरेला पेटले आहेत. पुण्यात यासाठीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात बॅनरबाजी करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात पवारांना आपला निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलन सुरु केले. काही ठिकाणी तर राजीनामे देखील देण्यात येत आहेत. पण पुण्यात मात्र ‘साहेब पदाधिकारी निवृत्त होत असतात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे. आज महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे. साहेब कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी…’ अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुण्यातीलच साहेब प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काळे यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिलं आहे. ‘आपण घेतलेल्या निर्णयाची बातमी वाचून व्यथित होऊन मी हे पत्र लिहीत आहे… आम्हाला पोरकं करू नका. साहेब मी आपला निष्ठावान कार्यकर्ता आहे. मला तुमच्या नेतृत्वात काम करायच आहे. आपण आपला निर्णय मागे घ्यावा ही विनंती.’ असा मजकूर संदीप यांनी या पत्रात लिहिला आहे. कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा पाहता शरद पवार यांनी मला विचार करायला २-३ दिवस द्या, असा निरोप कार्यकर्त्यांना पाठवत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. पण शरद पवार निर्णय मागे घेणार की आपल्या निर्णयावर कायम राहणार यावर मात्र सस्पेंन्स कायम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्या नावांची चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. पण भाजपात जाण्याच्या चर्चेत अजित पवार मात्र अध्यक्षपदाच्या शर्यतीत मागे पडले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!