अभिनेत्री नोरा फतेहीने असे करत सर्वांनाच केले घायाळ
नोराचा तो व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, एकदा बघाच
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- सौंदर्यासोबत घायाळ अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. अशातच आता नोराचा मराठमोळा थाट सर्वांना पहायला मिळाला आहे.तिचा हा थाट पाहून माधुरी देखील स्वतः शिट्टी मारण्यापासून थांबून शकली नाही.
नोराने झलक दिखला जा च्या १० व्या सिझनमध्ये भन्नाट लावणी केली. मला जाऊ द्याना घरी वाजले की बारा, या लावणीवर नोरा थिरकली आहे. यावेळी नोराचा पेहराव खूपच आकर्षक होता.हिरव्या रंगाची नऊवारी साडी, सोनेरी नाथ आणि जड ज्वेलरी घातलेली दिसत आहे. नोराचा डान्स पाहून माधुरीला देखील शिट्टी मारण्याचा मोर आवरता आला नाही. कलर्सने ऑफिशियल अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. याला अनेकांची पसंती मिळत आहे.नोरा फतेहीचा डान्स प्रत्येकाला वेड लावल्याशिवाय राहत नाही. तरुणाईंमध्ये नोराच्या डान्सची जास्तच क्रेझ पहायाला मिळते. नोराच्या हटके डान्सिंग स्टाईलवर सगळेच फिदा आहेत.
आपले सौंदर्य आणि नृत्याविष्काराने वेड लावणारी नोरा फतेही डान्स दिवाने ज्युनियरची जज आहे. तिचे अनेक व्हिडिओ शोच्या सेटवरून व्हायरल होत असतात. एकदा तर तिने बोल्ड ड्रेसवर लावणी केली होती. तिची ही लावणी अनेकांनी पसंत केली होती.तसेच तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत असतात.