लखनऊ – लग्नानंतर नववधू सासरी गेली. काही दिवसांनी माहेरच्यांची आठवण येऊ लागली म्हणून भेटण्यासाठी घरी गेली होती. मात्र ती परतच आली नाही. घरच्यांनी भरपूर शोधाशोध केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आल्याने सर्वच अवाक् झाले.
माहेरी परत आल्यानंतर ही तरूणी सामान आणण्यासाठी बाहेर पडली होती. दिवास गेलेली ती रात्री उशीरापर्यंत घरी आली नाही म्हणून घरच्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी तिचा खूप शोध घेतला , पोलिसांतही तक्रार दाखल केली असता, ती तिच्या प्रियकरासोबतच पळून गेल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर ती घरातील दागिने आणि रोख रक्कमही घेऊन गेल्याने सर्वांनाच मनस्ताप झाला आहे.
उत्तर प्रदेशातील बांदा येथील ही घटना आहे. नवविवाहित तरुणी लग्नानंतर प्रियकरासह पळून गेली. असे सांगितले जात आहे की, ३१ मे रोजी मुलीचे लग्न झाले होते, त्यानंतर ती आपल्या कुटुंबीयांना भेटण्याच्या बहाण्याने तिच्या माहेरच्या घरी आली होती. पण तिचा काही वेगळाच प्लॅन होता. काही सामान घ्यायचे आहे असे घरच्यांना सांगून ती बाजारात जाण्यास निघाली. त्यानंतर ती तिथून प्रियकरासह पळून गेली.यासोबतच तिने घरातून दागिने आणि रोख रक्कमही नेली आहे.
मुलगी घरी न परतल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी मुलीला फोन केला पण स्वीच ऑफ येत होता. त्यानंतर नातेवाईकांसह वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. परंतु नवविवाहित तरूणीबद्दल काहीच कळू शकले नाही. शेवटी कळले की ती नववधू तिच्याच भावाच्या सासरच्या एका नातेवाईकासोबत पळून गेली होती. व्यथित झालेल्या वडिलांनी दोन तरुणांच्या नावे एफआयआर दाखल केला आहे. आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे वडिलांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला.
6 जून ला गेली होती माहेरी
हे प्रकरण नरैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी ३१ मे २०२३ रोजी कालिंजर पोलीस स्टेशन परिसरात आपल्या मुलीचे लग्न लावून दिले होते. ६ जून रोजी मुलगी माहेरी परतली. त्यानंतर ११ जून रोजी ती वस्तू घेण्याच्या बहाण्याने बाजारात गेली आणि परत आलीच नाही. मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर मुलगी प्रियकरासह पळून गेल्याचे वडिलांना समजले. यासोबतच घरातून रोख रक्कम आणि दागिनेही नेले आहेत. मुलीचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून मुलीच्या भावाचा सासरचा नातेवाईक आहे.
वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस नवविवाहित महिलेचा शोध घेत आहेत. याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी यांनी सांगितले की, मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या तिचा शोध सुरू आहे. लवकरच मुलीला शोधण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल असे समजते.