Latest Marathi News
Ganesh J GIF

एअर होस्टेसची आमदारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या?

आरोपानंतर आमदारांची जेलमध्ये रवानगी, पण न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

दिल्ली दि २५(प्रतिनिधी)- संपूर्ण देशात गाजलेल्या गितिका शर्मा हत्याकांड प्रकरणी तब्ब्ल ११ वर्षानंतर हरयाणाचे माजी गृमंत्री आणि विद्यमान आमदार गोपाल कांडा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एअर होस्टेस गितीका आत्महत्या प्रकरणी दिल्लीतील रॉउज एवेन्यू कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

गोपाल कांडा यांच्या एअरलाइन्समध्ये गितिका एअर होस्टेस होती. दिल्लीतील अशोक विहार येथे ५ ऑगस्ट २०१२ रोजी गीतिका राहत्या घरात मृतावस्थेत आढळली होती. यावेळी गितिकाच्या घरात आढळलेल्या सुसाईड नोटच्या आधारे गोपाल कांडा आणि त्यांच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  ‘मी आतून तुटली आहे, म्हणून मी स्वतःला संपवत आहे. माझा विश्वासघात झाला. गोपाल कांडा आणि अरुणा अरुणा चढ्ढा हे दोघे माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत. दोघांनी माझा विश्वास तोडला आणि स्वतःच्या फायद्यासाठी माझा वापर केला. या लोकांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. आता हे लोक माझ्या कुटुंबाला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोघांनाही या चुकीची शिक्षा झाली पाहिजे’, असे गितिकाने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. याप्रकरणी गोपाल कांडा १८ महिने जेलमध्ये होते. हे प्रकरण घडलं तेव्हा गोपाल कांडा यांना हरियाणाचे एक मोठे नेते आणि उद्योगपती म्हणून ओळखलं जात होते. पण एअर होस्टेस आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्याने गोपाल कांडा यांना राजीनामा द्यावा लागला होता. गोपाल कांडा यांच्याविरुद्ध चार्जशीटमध्ये आयपीसी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याशिवाय त्यांच्यावर आयपीसीच्या सेक्शन १२० बी, २०१, ४६६, ४६८ आणि ४६९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान गोपाल कांडा अद्यापही हरियाणा लोकहित पार्टीमधून सरसाचे आमदार आहेत.

दिल्ली न्यायालयाने यावेळी गोपाल कांडा आणि माजी सहकारी अरुणा चढ्ढा यांचीही सुटका केली आहे. कोर्टाने यावेळी गोपाल कांडा यांना १ लाखांचा पर्सनल बाँड भरण्यास सांगितला असून, पोलिसांनी सुटकेविरोधात याचिका दाखल केल्यास हजर राहण्याचा आदेश दिला आहे. महत्वाचे म्हणजे गितीकाच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी तिची आई अनुराधा शर्मा यांनीही आत्महत्या केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!