
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे, सुरुवातीलाच मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटानं दोन जागांवर आघाडी घेतली आहे. बारामतीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत तर शिरूरमधून अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत.बारामतीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत तर शिरूरमधून अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार हे पिछाडीवर असल्याचं चित्र आहे.
बारामतीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत तर शिरूरमधून अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत. बारामतीमध्ये अटितटीची निवडणूक झाली होती. पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने आले. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सुप्रिया सुळे सध्या बारामतीमधून आघाडीवर आहेत.
तर दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची बनवली होती, आढाळराव पाटील यांनी ऐनवेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत शिरूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळवली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवण्यात आलं. या मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे.