अजित पवार गटाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर ; वडगाव शेरीतून सुनील टिंगरें, शिरुर हवेलीतून माऊली कटके रिंगणात
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आज आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीच्या माध्यमातून अखेर पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचा पेच मिटला आहे. वडगाव शेरीचे विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक इच्छुक होते, मात्र आज सकाळी पत्रकार परिषदेवेळी सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली, त्यामुळे जगदीश मुळीक याना हा मोठा धक्का मानला जात आहे.
पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना वगळून आपल्याला उमेदवारी मिळेल, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिल्याचा दावा भाजपचे माजी आमदार जगदिश मुळीक यांनी केला होता. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, पक्षाकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नव्हती. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरेंचे नाव देखील नव्हते. दुसरीकडे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या मतदारसंघाचा वाद निर्माण झाला होता. याच वादावर आज सकाळी सुनील टिंगरेंना उमेदवारी जाहीर करून तोडगा काढण्यात आला आहे.
दुसऱ्या यादीत ‘यांना’ मिळाली उमेदवारी
तासगाव कवठे-महाकाळ : संजय काका पाटील
अणुशक्तीनगर : सना मलिक
इस्लामपूर : निशिकांत पाटील
लोहा कंधार : प्रतापराव चिखलीकर
वांद्रे पूर्व : झिशान सिद्धकी
वडगाव शेरी : सुनिल टिंगरे
शिरुर : ज्ञानेश्वर कटके