
अर्थसंकल्पात अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना दणका
जे कारण सांगत ठाकरेंची साथ सोडली त्याचीच पुनरावृत्ती, महायुतीतून शिंदे गटाला काढण्याच्या हालचाली?
मुंबई – महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार धक्के दिले आहेत. त्यांनी मागितलेली मंत्रीपदे तर दिली नाहीतच शिवाय अनेक योजना बंद केल्या आहेत आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना धक्का देण्यात आला आहे.
महायुती सरकारमध्ये दोन नंबरची मंत्रीपदे शिवसेनेकडे आहेत. तर तीन नंबरची मंत्रीपदे अजित पवार यांच्याकडे आहेत. अर्थात भाजपाकडे क्रमांक एकची मंत्रीपदे आहेत. पण आता अर्थसंकल्पाचा विचार केला तर सर्वात कमी निधी एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना मिळाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार असताना ज्या कारणामुळे बंड केले असे सांगण्यात आले नेमकी तीच गोष्ट आताही घडल्यामुळे एकनाथ शिंदे गटाची गोची झाली आहे. महायुतीत भाजपचे १३२, शिवसेनेचे ५७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार आहेत. त्यामुळे आमदारांचा आकडा लक्षात घेता राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानी आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यांना मिळालेला निधी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना मिळालेल्या निधीपेक्षा जास्त आहे. भाजपच्या मंत्र्यांच्या खात्यांना ८९,१२८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यांना मिळालेला निधी ५६ हजार ५६३ कोटी रुपयांचा आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना ४१,६०६ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतानाही अजित पवार यांच्याकडेच अर्थमंत्रिपद होतं. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे. अजित पवार शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वाट्याला आलेल्या खात्यांना कमी निधी देऊन अन्याय करतात. त्यांच्याकडून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे आरोप एकनाथ शिंदेंसह अनेक मंत्री, आमदारांनी केला होता. त्यामुळे आता शिंदे आणि त्यांची शिवसेना नेमकं काय करणार याची चर्चा होत आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार आणि त्यांची जवळीक चांगलीच वाढली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचे काम फडणवीस यांनी केले आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या आग्रहामुळेच एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या योजना बंद केल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना महायुतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे का? अशी चर्चा होताना दिसत आहे.