Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवारांना आली डान्सर गाैतमी पाटीलची आठवण

अजित पवारांची जोरदार फटकेबाजी, गाैतमी ते मतदान, दादा म्हणाले रात्री तमाशा...

बारामती दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या भाषण शैलीमुळे ओळखले जातात. दरम्यान, अजित पवार यांनी मतदान करण्यावरून गाैतमी पाटीलचे उदाहरण देत मिश्किल टिप्पणी केली आहे. ते कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. त्यांच्या वक्तव्यामुळे एकच हशा पिकला होता.

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांनी तरुणांना भुरळ घातली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचा वाढदिवस असो की गावचा कार्यक्रम असो गौतमी पाटीलला पहिल निमंत्रण असतं. आता खुद्द अजितदादांनीच गौतमीच्या निमंत्रणावरून भाष्य केल्यामुळे अनेकांच्या नजरा चकित झाल्या आहेत. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना कृषी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान करण्याचं आवाहन केले. ते म्हणाले “लग्नाची तारीख आहे की नाही, त्या दिवशी मला माहित नाही. यात्रा असेल तर रात्री.रात्री कापा-कापीच.रात्री तमाशा. मग यात्रेला पाटीलबाईला बोलवायचं का? असं अजित दादांनी विचारतचा एकच हश्शा पिकला. नंतर दादांनी विचारलं, काय रे तिंच नाव. त्यावर मागून कोणी तरी सांगितलं की गौतमी पाटली. मग दादा म्हणाले, गौतमी. मी मध्यंतरी काहीतरी तिला बोललो, त्यानंतर ती म्हणाली, दादांनी मला असं सागितलं. त्यामुळे सर्वाना पाहता येईल असं काम प्रत्येकाने करायला हवं, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गौतमीला बोलावण्याचे प्रकार घडले, त्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले होते. त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली होती. त्यानंतर गौतमी पाटीलने दादांची माफी मागितली होती.

 

माझ्या विषयी अनेक बातम्या पसरवण्याचे काम केलं. पत्रकार जरा कुठ गेलं तर अजित पवार नॉट रिचेबल. बाकी लोक आहेत की..माझ्यामागे का आहेत बाबा? एखाद्याच्या मागे लागायचं म्हणजे किती मागे लागायचे? मी असं का बोललो, असं विचारले जाते. पण मी आज तुम्हाला सांगतो की मी कायमच राष्ट्रवादीमध्ये राहणार आहे, असा पुनरूच्चार अजित पवारांनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!