
ब्रेकिंग! अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार?
फडणवीसांची दिल्लीकडे वाटचाल, उद्धव ठाकरे बाजी पलटवणार, राजकारणात खळबळ, काय घडले?
पुणे – अजित पवार आणि उपमुख्यमंत्रिपद हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात दृढ झाले आहे. कारण आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कारभार केला आहे. पण मुख्यमंत्री पदाने मात्र त्यांना हुलकावणी दिली आहे. पण आता अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत.
पुण्यामध्ये भरल्या ४३ व्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनामध्ये राज्यासह देशातील नेत्यांचे भविष्य वर्तवण्यात आले. यात महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबद्दलही या संमेलनात भाकीत करण्यात आले आहे. अजित पवारांची संघर्षाची पत्रिका आहे. अजित पवार त्यांना खूप संघर्षानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळेल.’, असे भाकित ज्योतिषांनी वर्तवले आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस हे एक ‘लंबी रेस का घोडा’ असून ते दिल्लीकडे वाटचाल करतील. दिल्लीत ते मोठ्या पदावर काम करतील, असे भविष्य सांगितले आहे. त्यामुळे आपसूकच अजित पवारांसाठी मार्ग सोपा होईल असे भविष्य वर्तवले आहे. पक्ष फुटीनंतर ‘उद्धव ठाकरे यांची सद्यस्थिती कितीही वाईट असली तरी त्यांना हलक्यात घेऊ नये. त्यांच्यासाठी कठीण काळ असला तरी, राजकारणात त्यांचे अस्तित्व टिकून राहील.’, असे ज्योतिष म्हणाले आहेत. मात्र राज ठाकरेंना काहीही अतित्व नाही, असं ज्योतिष अभ्यासकांनी सांगितल आहे. ‘पीएम मोदी यांची पत्रिका एवढी मजबूत होती की त्यांनी सगळा भारत कॅप्चर केला आहे. त्यांची पत्रिका खूपच मजबूत आहे. पुढील काही वर्षांत मोदी राजकारण सोडून अध्यात्माकडे वळतील आणि ते अज्ञातवासात जातील.’ असा मोठा दावा ज्योतिषांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्रिपादाची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यांनी आतापर्यंत उमुख्यमंत्री होण्याची हॅटट्रिक केलेली आहे. मात्र त्यांना अद्याप मुख्यमंत्री होता आलेलं नाही. अजित पवार आतापर्यंत एकूण पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. सध्याची त्यांची सहावी वेळ आहे.