Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवारांचा धनंजय मुंडेंना जोरदार धक्का

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, मोदींच्या कार्यक्रमापासून मुंडेंना दुर ठेवत सुचक इशारा?

मुंबई – संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. पण काल वाल्मिक कराडला मोक्का लावताच परळीत कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यात धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबीयांची भेट घेतल्याने खळबळ उडाली होती. पण आता अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. यामुळेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष होता, तर या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवला जात असलेल्या वाल्मिक कराडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध आहेत, त्यामुळे आता पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेत अजित पवार यांनी बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्तीची निर्णय घेतला. त्यानंतर यापुढे पक्षात केल्या जाणाऱ्या तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या, अशा सूचना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्या आहेत. पण त्याचबरोबर नवीन जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील, असंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त झाल्यानं मंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाने हा पहिला मोठा धक्का दिल्याचं सांगितलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मोदी महायुतीतील आमदारांसोबत ते चर्चा करणार आहेत. त्यामुळे एवढा महत्वाचा कार्यक्रम सोडून मुंडे हे परळीला का गेले यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान मोदी आणि मुंडे यांच्या भेटीमुळे नागरिकांमध्ये काही गैरसमज होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक त्यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले आहे, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!