Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात भर पावसात अजित पवारांचा रोड शो, नागरिकांची तुफान गर्दी

पुण्यात अचानक धुवाधार पावसाने हजेरी लावली आहे. याच पावसाचा फटका राजकीय नेत्याच्या प्रचारावर होताना दिसत आहे. पुण्यातील हडपसर परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर पावसात रोड शो केला.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र रोड शो सुरु असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे कोणताही व्यत्यय न येऊ देता, अजित पवारांनी रोड शो सुरुच ठेवला. भर पवासातदेखील अजित पवारांच्या रोड शोला मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो आहोत. पावसात आम्हाला भिजायची सवय आहे. त्यामुळे पावसात रोड शो करण्याच फार विशेष नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. लोकांना आमच्याबद्दल विश्वास वाटतो, त्यामुळे पावसात एवढे लोक रोड शोला आले आहेत.

कोंढवा, लुल्लानगर, साळुंखे विहार, कौसरबाग, कात्रज गावठाण, कात्रद चौक, सुखसागर नगर, कोंढवा बुद्रूक नगर, गोखलेनगर आदी परिसरात हा रोड शो झाला. दरम्यान या रोड शो ला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. अजित पवारांनी शिवाजी आढळराव पाटलांना यांना मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन केलं. आमदार चेतन तुपे, योगेश टिळेकर, नाना भानगिरे, साईनाथ बाबर यांनी मतदार संघातून मोठे लीड देण्याचे भाष्य केले. घड्याळाला मतदान करुन आढळराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. असे आवाहन यावेळी सर्वांनी केले.हडपसर भागातील महायुतीमधील सर्वं सभासद हे रॅलीला उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत. त्यांनी देशाचा विकास गतिमान केला. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे भारताला जगात मानाचे स्थान मिळाले. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर गेली. ती तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या ठराविक लोकांनी काम करून चालणार नाही तर तळागाळातील कार्यकर्त्यांनी देखील काम केले पाहिजे. इमाने इतबारे काम करावे. कोणीही गंमत-जंमत करायचा प्रयत्न करू नका. अन्यथा तुमचा बंदोबस्त करावा लागेल, असे अजित पवार यांनी बजावले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!