Latest Marathi News
Ganesh J GIF

तुम्हाला फक्त दारू-मटण पाहिजे, तुमच्यापेक्षा xxxx बऱ्या

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना दिल्या शिव्या, त्या आक्षेपार्ह शब्दामुळे वाद(video)

बुलढाणा – बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आपल्या वादग्रस्त विधानासाठी कायम चर्चेत असतात. यावेळी मात्र थेट मतदारांनाच जाहीर शिवीगाळ केली आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यात जयपूर गावात आमदार संजय गायकवाड यांचा दुसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी मतदारांवर राग काढला. ते म्हणाले ‘तुम्हाला फक्त दारू, मटण पाहिजे, मतदार विकले गेले आहेत, असा आरोपी संजय गायकवाड यांनी केला. तसेच मतदारांपेक्षा वेश्या बऱ्या, असे आक्षेपार्ह शब्द वापरले. संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आमदार संजय गायकवाड यांचा विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून निसटता विजय झाला. कमी फरकाने झालेला विजय त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मी अब्जावधी रुपयांना लाथ मारली. शेवटी सत्याचा विजय झाला. माझ्या विरोधात सगळे विरोधक एक झाले. परंतु सगळे लटकले, असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी कडवे आव्हान दिले होते. जयश्री शेळके यांना ९० हजार ८१९ मते पडली होती. तर संजय गायकवाड यांना ९१ हजार ६६० मते पडली. संजय गायकवाड यांचा अवघ्या ८४१ मतांनी विजय झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना संजय गायकवाड यांनी शिविगाळ केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासंदर्भात वाद निर्माण करणारे वक्तव्य केले होते. तसेच बदलापूर प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू घेतांना वापरलेली भाषा यामुळे कायम वादातच असतात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!