Latest Marathi News
Ganesh J GIF

गणपती बाप्पासोबत राज्यात ‘याचेही’ होणार आगमन

'या' जिल्ह्यातील नागरिकांना करावे लागणार स्वागत

पुणे दि ३० (प्रतिनिधी)- गणपती उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण यंदा गणपती बप्पा येताना सोबत पावसालाही घेऊन येणार आहेत.ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर मुसळधार पाऊस झाला होता. पण त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती. पण गणरायासोबत तो येणार आहे.

हवामान खात्याकडून पुन्हा महत्त्वाच्या शहरांना पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गणेशोत्सवात पुण्यासह महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाची शक्यता आहे.मागील काही दिवसापासून पावसाने उसंत घेतल्याचे पाहायला मिळतं आहे. राज्यभर सध्या गणेशोत्सवाची धूम आहे, यामुळे हवामान खात्याकडून काही महत्त्वाच्या शहरांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, इतकंच नाहीतर मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळेल.कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सणासुदीच्या काळात पुणे, मुंबई उपनगरांसह कोल्हापूर, कोकण आणि साताऱ्यामध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसाच्या शक्यतेमुळे यंदा शेतकऱ्यांनामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!