
महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या अभिनेत्रीचा साडीत भन्नाट डान्स*
डान्स केलेले गाणे प्रसिद्ध गायकाकडून स्वरबद्ध, गाण्याला मिळाले लाखो व्हिव्ज, एकदा भन्नाट डान्स बघा!
अ.नगर – महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तब्बल ११ वर्षापूर्वी आलेल्या फ्रँडी सिनेमात ती झळकली होती. पण आता वेगळ्या कारणांमुळे ती चर्चेत आली आहे.
राजेश्वरीने सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने केलेल्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्री संजू राठोडच्या व्हायरल गाण्यावर राजेश्वरीने जबरदस्त डान्स केला आहे. राजेश्वरी खरातने साडी नेसून ट्रेडिशनल लूकमध्ये ‘शेकी’ गाण्यावर ठेका धरला आहे. “एक कंबर, तुझी कंबर…” या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. ‘Shaky’ या नवीन गाण्याचा लेखक आणि गायक स्वत: संजू राठोड याने केले आहे. ‘गुलाबी साडी’ या गाण्यामुळे संजू राठोड जगभरात लोकप्रिय झाला. ‘गुलाबी साडी’, ‘काली बिंदी’ या गाण्यांनंतर आता त्याच्या ‘शेकी’ गाण्याचीही सर्वत्र चर्चा रंगली आहे. डान्स व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने इतकं सुंदर गाणं बनवल्याबद्दल संजूचे आभार मानले आहेत. दरम्यान, राजेश्वरी खरातच्या ‘शेकी’ गाण्यावरील डान्सवर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. दरम्यान, फँड्री चित्रपटातील शालू-जब्याची भूमिका साकारणारे दोन्ही कलाकार आता मोठे झाले आहेत. याशिवाय सोशल मीडियावर देखील राजेश्वरी आणि सोमनाथ कायम सक्रिय असतात.
काही दिवसापूर्वी राजेश्वरीने ख्रिश्चन धर्मातील एका विधीचा फोटो शेअर केल्याने बरीच चर्चा झाली होती. अनेकांनी तिच्यावर जोरदार टिका केली होती. पण राजेश्वरीने देखील आपला धर्मच ख्रिश्चन असल्याचे सांगत टिका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.