
कमाल! लग्नात नवरीने नवरदेवासोबत केला भन्नाट डान्स
भन्नाट डान्स स्टेपचा झकास व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, नवरीचा डान्स बघून नवरदेवही शाॅक
पुणे – लग्न म्हटलं की सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. लग्नात इतक्या विधी आणि परंपरा असतात की नवरा-नवरी अक्षरश: हैराण होत असतात. पण अलीकडे लग्न म्हटले की नवरा नवरीचा डान्स हा ठरलेला असतो. तसा ट्रेंडच झाला आहे.
अगोदर लग्नात फक्त निवडक पाहुणेमंडळी आणि मित्रच नाचायचे. पण काळ बदलला आहे. आता लग्नात महिलामंडळीही डान्स करत असतात. पण लग्नात जर नवरा नवरीने डान्स केला तर तो क्षण एकदम खास असतो. आणि आता नवरा नवरी सुद्धा डान्स करत आपले प्रेम व्यक्त करत आहेत. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, नवरा नवरी आपल्याच हळदीच्या कार्यक्रमात भन्नाट डान्स करत आहेत. यावेळी नवरी-नवरदेवाच्या डान्स मूव्हज् पाहून तर सारेच जण आश्चर्य झाले. हळदीच्या कार्यक्रमात डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, हल्लीच्या काळात नववधू सजून मंडपात नवरदेवाची वाट पाहण्याऐवजी संपूर्ण वऱ्हाडी मंडळींसमोर डान्स करण्याची प्रथाच रूढ होत आहे.
हा व्हिडीओ amol.kharat.7140497 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण नवरा-नवरीच्या डान्सचं कौतूक करताना दिसत आहे. तर अनेकांनी हटके आणि अनोख्या शब्दात नवरा नवरीचे काैतुक केले आहे.