Latest Marathi News
Ganesh J GIF

शिरूर लोकसभा निवडणुक पुन्हा लढवण्यास अमोल कोल्हेंचा नकार?

शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या या आमदाराची दावेदारी, पण पक्षाची भुमिका वेगळीच

पुणे दि २(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाने नव्या चेहऱ्यांचा शोध सुरु केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने नुकताच लोकसभा निवडणूकींचा आढावा घेतला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, गुलाबराव देवकर आणि अनिल पाटील यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासंबंधात विचारणा करण्यात आली होती. पण त्यांनी मात्र विधानसभेलाच पसंती दिली आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे शिरूर मतदारसंघातून यंदा अमोल कोल्हे लोकसभा लढवण्यात इच्छुक नाहीत. त्यातच राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी थेट शिरूर मतदारसंघात भावी खासदार अशी बॅनरबाजी करत आपली दावेदारी सादर केली आहे. कोल्हे यांचा मतदारसंघातील घटलेला जनसंपर्क यामुळे कोल्हे यांच्याएैवजी लांडे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे. लांडे यांनी “२०१९ पासूनच मी आगामी लोकसभेची तयारी करत होतो. आगामी लोकसभेला अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील तर त्यांना माझा विरोध नाही. अशी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी अजून आपले पत्ते उघड केले नसले तरी कोल्हे लवकरच भाजपात जाणार अशी चर्चा होत असते. त्यामुळे कोल्हे भाजपात जाऊन की राष्ट्रवादीत थांबून लोकसभेची उमेदवारी मिळवणार यावर चर्चा होत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला सुटणार हे अद्याप ठरलेलं नाही. त्यामुळे अजित पवार,जयंत पाटील यासारखे नेते आपले मत कोणाच्या पारड्यात टाकणार हे पहावे लागले दरम्यान शरद पवार दिलीप वळसे पाटील यांना देखील लोकसभेसाठी गळ घालू शकतात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!