आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.यातच आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी बेस्ट मुख्यमंत्री कोण, याबाबत सूचक विधान केले आहे. तसेच राज्यातील अनेक मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले . पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, लाडका भाऊ योजना आणली आहे. सर्वकाही धडधाकट असलेल्या तरुणांना सरकार जादा पैसे देते आणि ज्यांना हातपाय नाही त्यांची एक हजार रुपयांवर बोळवण करते हे योग्य नाही. आम्ही येत्या ९ तारखेला ऑगस्ट क्रांती दिनी विभाग आयुक्त कार्यालयावर निराधार आणि दिव्यांगाना घेऊन मोर्चा काढणार आहोत. राज्य सरकारने केवळ जातीनिहाय आणि मतदारांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि भाऊ योजना आणली, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
मी मांडलेले मुद्दे संपले की विषय संपला. मग मी निवडणूक लढणार नाही. आम्ही एकटे लढणार आहोत. शेतकऱ्यांनासोबत घेऊन लढणार आहोत. मराठवाड्यात यंदा विधानसभेचे उमेदवार देणार आहोत, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलत असताना बच्चू कडू यांना बेस्ट मुख्यमंत्री कोण, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण यांच्यापासून आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री पाहिले. अनेकांची कामे पाहिली.आतापर्यंतचा सर्वांत बेस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाटल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख म्हणून ठीक आहेत. मुख्यमंत्री म्हणून नाहीत, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.सरकारने आता ‘लाडका दिव्यांग योजना’ आणावी ‘लाडका पत्रकार’ ही योजना देखील आणावी. पूजा खेडकर प्रकरणात आम्ही आणखी आम्ही १५ दिवस वाट पाहणार आहोत नंतर आम्ही धडा शिकविणार आहोत, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.