बीड दि २५ (प्रतिनिधी)- राज्यभरात आता बैलपोळ्याचा उत्साह आहे. शेतकरी आणि बैलांचं एक अनोखं नातं आहे. अनेक भागात पोळा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो पण बीडमध्ये मात्र या दिवशी चक्क देशी दारुचा नैवेद्य दिला आहे. या परंपरेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
बीडमधील शेतकरी महादेव बाबूराव पोकळे यांनी आपल्या सर्जा राजाचा बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करताना त्यांनी चक्क दारूच्या नैवेद्द्याचा बेत आखला होता. दोन्ही बैलांना यावेळी शेतकऱ्याने देशी दारु पाजली. त्यामुळे पंचक्रोशीमध्ये याची चर्चा सुरू आहे. बैलाचा साज, पायात घुगराचा चाळ, शिंगात, शेंब्या, गळ्यात घागरमाळ, पिताळाचा तोड्याचा जोड असा साज देखील बैलांना करण्यात आला होता.बीडच्या आष्टी तालुक्यातील देविनिमगाव येथे एक विचित्र प्रकार बघायला मिळाला. पंचक्रशीत या नैवेद्याची चर्चा होऊ लागली आहे.
श्रावण महिना हा सणांनी भरलेला महिना. नागपंचमी, नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन, गोकुळाष्टमी पाठोपाठ सरत्या श्रावणाच्या आमावस्येला येणारा सण म्हणजे बैलपोळा. या दिवशी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते. शेतकरी आणि बैल यांच्यासाठी हा दिवस खूप मोठा दिवस मानला जातो. पण या शेतकऱ्याने तो दिवस देशी करून टाकला आहे.