Latest Marathi News
Ganesh J GIF

मराठी मोर्चात प्रताप सरनाईकांच्या विरोधात रोष, बाटली फेकून मारली

मराठी माणसासमोर सरकार नमले, मोर्चाला परवानगी, सरनाईकांविरोधात रोष, जय गुजरात म्हणताच काढता पाय(video)

मीरा भाईंदर – अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीने मंगळवारी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, स्थानिक पोलिस प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

मराठीसाठी काढलेल्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे मनधरणी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची धरपकड सुरू होती. त्यावर बोलताना मोर्चाला परवानगी दिली नाही, ही पोलिसांनी भूमिका अत्यंत चुकीची आहे. पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, असे म्हणत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मी मोर्चात सामील होण्यासाठी आले होते. पण आंदोलकांनी सरनाईक यांना मोर्चात सामील होण्यापासून रोखले, त्याचबरोबर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाल्यामुळे सरनाईक यांनी मोर्चातून काढता पाय घेतला. सरनाईक मोर्चात आल्यानंतर आक्रमक झालेल्या मराठी भाषिकांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. याचदरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर बाटली भिरकावल्याचीही घटना घडली. यावेळी आंदोलकांनी प्रताप सरनाईक यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. प्रताप सरनाईक गो बॅक, जय गुजरात अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. आंदोलकांचा हा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी प्रताप सरनाईक यांना मोर्चामधून बाहेर काढले. मंत्री सरनाईक हे भाषणही करणार होते, मात्र आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून त्यांनी काढता पाय घेतला. प्रताप सरनाईक यांनी याआधी मराठी भाषिकांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांना आमचा विरोध आहे, असं म्हणत मोर्चेकऱ्यांना प्रचंड घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान मनसेच्या मोर्चाला इतर पक्षांचाही पाठिंबा मिळाल्यानंतर आणि मराठीच्या मुद्द्यावर नागरिक मीरा भाईंदरमध्ये जमू लागल्यावर सरकारला देखील नरमाईची भूमिका घ्यावी लागली आणि मोर्चाला परवानगी द्यावी लागली.

 

मनसे नेते नितीन सरदेसाई, संदिप देशपांडे यांनी लोकलचा प्रवास करून मीरा रोड येथील आंदोलनात सहभागी झाले. ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे देखील आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनात मनसे, शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!