Latest Marathi News
Ganesh J GIF

अंकिता पाटील यांनी “सुप्रिया सुळेंचा तो व्हिडीओ पोस्ट केला, त्या व्हिडीओ मध्ये नेमक काय आहे नक्की बघा

लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत निश्चित आहे. दरम्यान, आज (23 मार्च) बारामतीतील इंदापूर येथे महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर टीका करताना जित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अशातच आता भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील हिने सुप्रिया सुळेंचा शेतकरी मेळाव्यातील व्हिडीओ ट्वीट करत दत्ता भरणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत काही दिवसांपूर्वीच मित्र पक्षांचे स्थानिक पदाधिकारी माझ्या विरोधात सभा घेऊन अतिशय अर्वाच्च भाषेत टीका करत आहेत. तालुक्यामध्ये फिरु देणार नाही, अशी धमकी देत असल्याचे म्हटले होते. त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की, अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण या बाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले होते.अंकिता पाटील यांनीही त्यांच्या भाषणातून दत्ता भरणे यांचं नाव न घेता त्यांच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला होता की, माझ्या वडिलांचा एकेरी उल्लेख केला तर मलाही ठाकरे शैलीत प्रत्युत्तर देता येते. यानंतर आता अंकिता पाटील यांनी “जैसी करनी….वैसी “भरणे” असे शीर्षक देत शेतकरी मेळाव्यातील सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ पोस्ट करत दत्ता भरणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, शेतकरी मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सध्या दमदाटी केली जात आहे. शरद पवार यांच्या सभेला जाऊ नका, असे सांगितले जात आहे. पण मला सांगायचं आहे की, हा इंदापूर तालुका आहे. इथे शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. इथले लोक फोनला, धमक्यांना घाबरणार नाहीत. विरोधकांनी त्यांचाच विचार करावा. कारण त्यांचा विधानसभेत करेक्ट कार्यक्रम होणार आहे”, असा इशार सुप्रिया सुळे यांनी दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता दिला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!