मोदींवर आणखी एका अभिनेत्रीने केले गंभीर आरोप
गरोदर राहिल्यानंतरच्या घटना सांगताना अभिनेत्री म्हणाली, मी खूप रडले पण...
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मराठी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मालिकेत काम केलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्री,मोनिका भदोरिया यांच्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत.
‘तारक मेहता’ या मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजाने निर्मात्यांबद्दल मोठे खुलासे केले आहे. एका मुलाखतीत तिने मोठे खुलासे केले आहेत. प्रिया म्हणाली की, “मालवशी लग्न झाल्यानंतर सेटवरची सगळी परिस्थिती बदलली आणि गरोदर राहिल्यावर यात आणखी बदल झाला. मूल झाल्यावर मी मालिकेत परत येण्याबद्दल विचारले, परंतु मला समोरून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. एके दिवशी मी असित मोदींना मेसेज केला की मला तुमच्याशी बोलायचे आहे, त्यानंतर त्यांनी फोन केला. मी त्यांना सांगितले की, रिटाच्या भूमिकेबद्दल बोलायचे आहे, यावर ते म्हणाले, आपण नंतर बोलू. एवढे बोलून त्यांनी फोन ठेवला तेव्हा मी खूप रडले. एवढी वर्ष काम करून मला जराही आदर नाही का? मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर न देता फोन त्यांनी फोन ठेवला.” असा कटु प्रसंग तिने सांगितला. त्याचबरोबर “एकदा इंडियन आयडॉलमध्ये कार्यक्रमाची पूर्ण टीम गेली होती. परंतु प्रियाला त्यांनी कधीच बोलावलं नाही. त्याचं तिला खूप वाईट वाटायच” असा दावा तिने केला. प्रियाने दिग्दर्शक मालव राजदा यांच्याशी लग्न केले आहे.
जेनिफरने मालिकेत १४ वर्ष काम केले यादरम्यान मी तिला कोणाशीही गैरवर्तन करताना पाहिले नाही. ती वेळेवर यायची आणि तिचे कामे करायची. परंतु तिने केलेल्या इतर आरोपांबाबत कोणतीही माहिती नसल्याचे प्रियाचे पती मालव यांनी सांगितले आहे.