Latest Marathi News
Ganesh J GIF

चिंता वाढणार! मान्सूनबाबात हवामान खात्याची चिंता वाढवणारी अपडेट

‘एल निनो’ नंतर मान्सुनला मोचा चक्रीवादळचा धोका, महाराष्ट्रात या तारखेला दाखल होणार

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- यंदा पावसाळा उशीरा आणि कमी येणार असा अंदाज असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. यंदा मान्सूनला उशीर होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच केरळमध्येही मान्सून उशिराच येणार आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख एक जून असते. मात्र यंदा त्यातुलनेत तीन दिवस उशिराने मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात देखील मान्सून येण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच सरकारचीही चिंता वाढवण्याची शक्यता आहे. कारण पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी झपाट्याने घसरत आहे. अल निनोमुळे यंदा पाऊस कमी असल्याची शक्यता असताना मोचा चक्रीवादळ रविवारी म्यानमारच्या उत्तर-पश्चिमी किनाऱ्यावर धडकलं. त्यामुळे मान्सूनच्या वाटेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा मान्सूनला उशीर होऊ शकतो असा अंदाज व्यक्त हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मान्सून त्याच्या नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा तीन दिवसांनी उशीर होऊन ४ जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे.यंदा सरासरीएवढाच पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीकडून मे महिन्याच्या सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये मान्सूनचे उशिरा होणारे आगमन हा चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

यावर्षी ११ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होणार होईल तर ७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून येईल, असा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सूनची गती धिमी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना योग्य सल्ला घेऊनच पीकपेर्‍याचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!