Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रेमासाठी काहीपण! गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट देण्यासाठी अल्पवयीन मुलाने केलं असं काही कि… आई झाली हैराण

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – दिल्लीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका मुलाला अटक केली आहे. या मुलाने आपल्या गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट करण्यासाठी आणि तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी पैसे गोळा करण्यासाठी आपल्या आईचे दागिने चोरले होते. दिल्लीतील नजफगडमध्ये ही घटना घडली. दागिने गायब झाल्याची तक्रार मुलाच्या आईने पोलिसात केली होती. सोन्याचे झुमके, सोन्याची अंगठी आणि एक चेन गायब होती. पोलिसांनी तपास सुरू करून दोन सोनारांकडून हे दागिने जप्त केले. तसेच एका सोनारालाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी एका महिलेने आपल्या घरात चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. तिने सांगितलं होतं की, २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी तिच्या घरातून सोन्याची चेन, सोन्याचे झुमके आणि सोन्याची अंगठी चोरून नेली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र घरात कोणीही आलं नसल्याचं पोलिसांना आढळून आलं. यानंतर या गुन्ह्यात घरातील व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय तपास पथकाला आला. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, गुन्हा घडल्यापासून अल्पवयीन मुलगा बेपत्ता असल्याचं पोलिसांना आढळून आलं. यानंतर टीमने त्याच्याविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यासोबत शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या मित्रांचीही चौकशी केली. त्याने ५० हजार रुपये किमतीचा नवीन आयफोन खरेदी केल्याचं तपास पथकाला समजलं.

पोलिसांच्या पथकाने यानंतर धरमपुरा, काक्रोला आणि नजफगडमधील तो लपलेल्या ठिकाणांवर अनेक छापे टाकले, परंतु प्रत्येक वेळी तो पळून जाण्यात यशस्वी झाला. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अल्पवयीन मुलगा आपल्या घरी येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. यानंतर घराजवळ सापळा रचण्यात आला. पोलिसांनी आरोपींकडून आयफोन जप्त केला आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान मुलाने खुलासा केला की तो एका खासगी शाळेत नववीचा विद्यार्थी आहे. वडिलांचं आजारपणामुळे निधन झालं. अभ्यासात त्याचं अजिबात मन लागत नाही. मुलगा त्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितलं. त्याला गर्लफ्रेंडला वाढदिवसाचं काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं. आईकडे पैसे मागितले, मात्र आईने पैसे देण्यास नकार दिला. नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने आपल्याच घरात चोरी करण्याचा निर्णय घेतला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!