Latest Marathi News
Ganesh J GIF

साडेतीन हजार कोटींच्या घोटाळाप्रकरणी अर्चना कुटेला अटक

लाखो ठेवीदारांच्या अब्जावधी रुपयांवर मारला होता डल्ला, दीड वर्षापासून होती फरार, एवढे घबाड सापडले

पुणे – तब्बल ४००० हून अधिक ठेवीदारांची फसवणुक प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक अर्चना सुरेश कुटे हिला अटक केली आहे. गेली दीड वर्षापासून कुटे फरार होती. दरम्यान, सीआयडीने बाणेर येथुन तिला अटक केली आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे याला सीआयडीने यापूर्वीच अटक केली आहे. अर्चना कुटे ही सुरेश कुटे याची पत्नी आहे. बीड, जालना, तसेच छत्रपती संभाजीनगरमधील ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात गेले दीड वर्ष फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या फरार संचालक अर्चना सुरेश कुटे, आशा पद्माकर पाटोदेकर (पाटील) यांच्यावर सीआयडीने कारवाई केली आहे. या प्रकरणात संचालक मंडळाविरुद्ध ९५ गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर संचालक अर्चना कुटे, आशा पाटोदेकर या पसार झाल्या होत्या. कुटे ग्रुपची बिजनेस प्रमोटर अर्चना कुटे हिने अपहरीत रक्कमेतून मिळवलेली जंगम मालमत्ता, ज्यात सोने ८० लाख ९० हजार ९५० रुपयांचे ६० नग, ५६ लाख ७५ हजार ५०० रुपयांचे चांदीचे २७० नग, ६३ लाख रुपयांची रोकड तसेच १० लाख रुपयांची बीएमडब्ल्यु, स्कुटी असा २ कोटी १० लाख ७५ हजार ३२० रुपयांचा मालमत्तेचा समावेश असून ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सुरेश कुटे आणि त्याची पत्नी अर्चना कुटे यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ४ लाखांहून अधिक ठेवीदारांचे सुमार २ हजार ४७० कोटी रुपये जमा केले होते. या प्रकरणात एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी)ने सुरेश कुटे आणि इतर आरोपींच्या ३३३ कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. दरम्यान गतवर्षी कुटे ग्रुपच्या सर्वच समुहांवर इन्कम टॅक्स विभागाच्या वतीने छापा घालण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात करचोरी केल्याचे उघडकीस आले होते. ‘द कुटे ग्रुप’वर इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई झाल्यानंतर त्याचा परिणाम ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या व्यवहारावर झाला होता.

पोलिसांच्या आशीर्वादावर तब्बल वर्षभर पुणे, मुंबई, महाबळेश्वर अशा ठिकाणी मौज करत फिरणार्‍या अर्चना कुटे यांना अखेर सीआयडीच्या पथकाने पुणे शहरातील पाषाण रोड भागातून अटक केली आहे. त्यांच्यासोबत आशिष पाटोदकरच्या आईला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!