
तुमची जातच तशी, तुम्ही रां**** आहात का? तुम्ही एकत्र राहता म्हणजे तुम्ही…..
पुण्यातील पोलिसांचे तरुणींसोबत गैरवर्तन, जातीवाचक शिविगाळ करत चारित्र्यावर आरोप, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
पुणे – पोलीसांकडुन बळाचा दुरूपयोग झाल्याची घटना पुण्यातील कोथरूड येथून समोर आली आहे. तीन पोलीसांनी बळाचा वापर करत तीन महिलांना मानसिक आणि शारिरिक त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
घरगुती हिंसाचारातील एका पिडितेला मदत केल्याच्या रागातून तीन सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. एका पिडीत महिलेला मदत केल्याच्या कारणातून तीन सामाजिक कार्यकर्त्यांना कोथरुड पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप एका तरुणीने केला आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एक महिला पुण्यात आली होती. या महिलेला तीन सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या महिलांनी मदतीचा हात दिला तिला स्वावलंबी बनवण्यासाठी कोर्सेसचीही सोय केली. मात्र या पिडीतेच्या नातेवाईकांपैकी एकजण संभाजीनगरमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी आहे. या अधिकाऱ्याने कोथरुड पोलिसांच्या मदतीने या सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या मुलींना ताब्यात घेतले अन् मारहाण केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील आणि संभाजीनगर येथील कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे, असा आरोप महिलांच्या मैत्रीणीने केला आहे. कोणत्याही वॉरंटशिवाय किंवा कायदेशीर प्रक्रियेशिवाय, कोथरूड पोलिसांनी आम्हा तीन महिलांच्या घरी छापा टाकला. यानंतर आम्हाला जबरदस्तीने ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये नेलं, असा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर कोथरुड पोलीस ठाण्यातील पीएसआय प्रेमा पाटील या मुलींना म्हणाल्या की, तुम्ही महार-मांगाचे ना, मग तुम्ही असचं वागणार आहे, तुम्ही वाया जाणार आहात. तुमची जात अशीच आहे, तू किती पोरांसोबत झोपलीस , तू रां** आहेस, असे प्रेमा पाटील यांनी म्हटल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसेच तुमचा खून होईल, अशी धमकी देखील देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पीएसआय कामटे यांनीही मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. एका मुलीने पोलिसांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर पीएसआय कामटे संतापले. या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा आम्ही हे प्रकरण लावून धरु, अशी मागणी श्वेता एस या तरुणीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान संभाजीनगरमधून निघून आलेल्या महिलेचा जबाब पोलिसानी घेतला. तीन वन स्टाॅपसेंटरमध्ये होती. तिने सांगितले की, पती अक्षय याच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आणि माझे पुढील करियर बनवण्याकरिता पुणे शहर येथे माझ्या मर्जीने व स्वखुशीने आली असल्याचे सांगितले आहे.
https://www.facebook.com/share/v/16JYv4mezB/
या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी तरूणीने सांगितलेली घटना जर खरी असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.