Latest Marathi News
Ganesh J GIF

सैन्यदलातील पतीने पत्नीची हत्या करुन रचला बनाव पण…

वैद्यकीय अहवालात वेगळीच माहिती समोर आल्याने पोलिसही चक्रावले, धक्कादायक कारण समोर

अकोला दि १४(प्रतिनिधी)- अकोल्यात पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पती भारतीय सैन्यदलात कार्यरत आहे. हत्या केल्यानंतर आत्महत्येचा बनाव रचण्यात आला. पण शवविच्छेदन अहवालामुळे बिंग फुटले. त्यानंतर पोलीसांनी पतीला अटक केली आहे.

पातुर तालुक्यातील दिग्रस गावातील सारिका विकास गवई असे हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पती विकास गवईला अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका अन् विकास यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला. लग्नानंतर काही दिवस सुरुवातीला चांगले गेले. त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीवरून नेहमी दोघांमध्ये सतत वाद व्हायचा. विकास पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. तर सारिकाही पतीच्या चारित्र्यावर संशय घ्यायची. घटनेच्या दिवशी देखील दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पतीने सारिकाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव रचला. तशी माहिती त्याने स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठविला. पण वैद्यकिय तपासणीत विवाहितेची गळा आवळून हत्या केल्याचं समोर आले. त्यानंतर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद हटवत हत्येचा गुन्हा दाखल केला. दरम्यान पती मात्र पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली, या शब्दांवर अजूनही ठाम आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सैनिक पती विकास जगन्नाथ गवई, दिर सुहास जगन्नाथ गवई, आणि सासरे जगन्नाथ दौलत गवई या तिघांविरुद्ध रात्री हत्येचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन करत आहेत. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने पोलीसांना दिले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!