Latest Marathi News
Ganesh J GIF

वडिल रागावल्याने मुलाने रेल्वे स्थानकावर केले भलतेच कृत्य…

पालकांनो मुलांना रागावण्या अगोदर ही बातमी बघाच, व्हिडीओ व्हायरल

फिरोजाबाद दि ८(प्रतिनिधी)- आई वडिल नेहमी आपल्या मुलांची काळजी करत असतात.त्यातून ते अनेकदा आपल्या मुलांना सल्ला देत असतात पण आजकाल काही मुलांना आपल्या आईवडिलांनी दिलेला सल्ला आवडत नाही, त्यातुन ते कधीकधी टोकाचा निर्णय घेतात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

आयआयटीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याचे वडील रागावले. त्यामुळे दुखावल्या गेलेल्या मुलाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मन दुखावलं गेल्याने तो थेट रेल्वे रूळावर जाऊन झोपला. फिरोजाबाद रेल्वे स्थानकावर हा सर्व प्रकार घडला आहे. त्याला रेल्वे रूळावर झोपलेला पाहुन एकच खळबळ उडाली.रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने रेल्वे रूळावर धाव घेत त्याला उचलून प्लॅटफॉर्मवर आणले. त्याला असे करण्याबाबत विचारले असता वडिल रागावल्याने आपण असे केल्याचे त्या तरूणाने सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याचे त्याच्या वडिलांसोबत काही वाद झाले. यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला शिवीगाळ केल्याने त्याला राग आला आणि त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याला वेळीच प्लॅटफॉर्मवर आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!