Latest Marathi News
Ganesh J GIF

कामाला उशीर झाल्याने लिफ्ट मागितली आणि काळाने डाव साधला

धडकी भरवणा-या भयंकर अपघाताचा व्हिडीओ व्हायरल, शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा, तीन महिन्यापूर्वी झाले होते लग्न

पुणे – तळेगाव – चाकण महामार्गावरील खालुंब्रे ता.खेड गावच्या हद्दीतून दुचाकीवरून कंपनीत कामावर जाणाऱ्या मनुष्यबळ विकास अधिकाऱ्याचा अवजड कंटेनरच्या खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

गजानन बाबुराव बोळकेकर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. विजय शंकरराव तंतरपाळे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद अरमान कमरुददीन खान या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य गायकवाड आणि गजानन बोळकेकर हे दुचाकी वरून सकाळी कंपनीत कामावर जात होते. मोहम्मद खान हा आपल्या ताब्यातील कंटेनर मुंबईकडून चाकण बाजूकडे भरधाव वेगात घेऊन जात होता. रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन ओव्हरटेक करताना दुचाकीस धडक दिली. यामुळे दुचाकी घसरून पडल्याने दुचाकीच्या मागे बसलेले गजानन हे कंटेनरचे पाठीमागील चाक आल्याने त्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीचालक आदित्य गायकवाड हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास घडला. आरोपी कंटेनर चालक आपले वाहन बेदरकारपणे आणि भरधाव वेगात चालवत होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याने आदित्य गायकवाड यांच्या स्प्लेंडर दुचाकीला जोरदार धडक दिली. कामावर जाण्यासाठी लिफ्ट घेतलेल्या तरुणाचा हा प्रवास दुर्दैवाने अखेरचा ठरला आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

 

गजानन बोळकेकर चाकण एमआयडीसीच्या पानसे ऑटो कॉम युनिट या कंपनीमध्ये एचआर म्ह्णून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार ३ महिन्यापूर्वीच गजानन यांचे लग्न झाले होते. अपघाताच्या दिवशी कंपनीत जायला उशीर झाल्याने त्यांनी लिफ्ट मागितली होती. परंतु ट्रेलरखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!