
झकास! हळदीत नव्या नवरीने केला खतरनाक डान्स
डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, नवरीने नवरोबालाही लाजवले, एकदा बघाच!
पुणे – अलीकडे लग्नाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. अगोदर नवरा आणि नवरी एकमेकांकडे पाहत देखील नसायचे. पण आता काळ बदलला असून नवरा नवरी आपले लग्न हटके करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत.
लग्नसोहळा ही गोष्ट गेल्या काही वर्षांत सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाताना दिसते आहे. डान्स पासून वेगवेगळ्या कार्यक्रमांपर्यंत हल्ली लग्नामध्ये नियोजन केलं जातं. अशातच आता नवरा-नवरीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हळदीच्या कार्यक्रमात नवरा नवरीने भन्नाट डान्स करत सगळ्यांना चकित केले आहे. “खंडेरायाच्या लग्नाला बानु नवरी नटली…” या मराठमोळ्या गाण्यावर नवरा नवरीनं स्वत:च्या हळदीला भन्नाट डान्स केला आहे. यावेळी नवरा नवरीचे एक्सप्रेशन आणि चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ divya___3128 नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सध्या अशाच प्रकारचा लग्नातील नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सर्वांना आवडत असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धूमाकुळ घालताना दिसतो आहे.
सध्या लग्नात वऱ्हाडी मंडळींसोबतच नवरा-नवरींनी डान्स करायचाही ट्रेन्ड आला आहे. लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात. असे व्हिडिओ आवडीने पाहिले देखील जातात.