विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी दुर्राणी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत.आज दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. शरद पवारांसोबत जात असल्याची माहिती स्वतः आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली आहे.पक्षप्रवेशावर बाबाजानी दुर्राणी यांनी बोलताना सांगितलंं की, अजित पवार जातीयवादी पक्षांसोबत गेल्याने मुस्लीम समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. बाबाजानी दुराणी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. शिवसेना (शिंदेगट), भाजप यांच्यासोबत आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा अॅडजस्ट होत नाही. अशाच निवडणुकीत काम करणं फार कठीण जातं असं बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटलं आहे.
“आता दोन वाजता संभाजीनगरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. मला कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. विचारसरणीच्या आधारावर मी हा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण राज्यात माझ्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. सबंध देशात मुस्लीम समाजाची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या पक्षांना मुस्लीम मतदार मतदान करायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत एखाद्या पक्षासोबत राहणं आणि काम करणं अवघड होतं. त्यामुळे मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.”दरम्यान, पाथर्डीत गेल्या अनेक दिवसांपासून कुजबूज सुरू होती. तूर्त राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी हे गेल्या अनेक दिवसांपासून या पक्षात अस्वस्थ असल्याचं वारंवार बोललं जात होतं. तसेच, राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाशी त्यांची बोलणी चाललेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जर काही शब्द मिळाला, तर बाबाजानी हे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील, अशी परिस्थिती असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.
आज संभाजीनगर येथील राष्ट्रवादी भवन मध्ये मी दोन वाजता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. मला कोणत्याही प्रकारचा आश्वासन मिळालेलं नाही. विचारसरणीच्या आधारावर मी प्रवेश करत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने फक्त मतदारसंघात नाही तर पूर्ण राज्यात माझं स्वागत होईल. संपूर्ण देशात मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणावर कुचंबना होत आहे. जे भाजपासोबत आहे त्यांना मतदान करायला मुसलमान नको म्हणत आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या पक्षासोबत आपण राहणं आणि काम करणं हे अवघड होतं.