बंजारा समाजाची मा. मुख्यमंत्र्यांच्या घरावर दगडफेक
आरक्षणाच्या मुद्द्यावर बंजारा समाज आक्रमक,पोस्टरही जाळले, पोलिसांचा लाठीचार्ज
बंगरुळू दि २७(प्रतिनिधी)- बंजारा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कर्नाटकमध्ये चांगलाच तापला आहे. आरक्षणानाचे निकष बदलल्यामुळे शिवमोग्गा भागात बंजारा समाजाकडून जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. यावेळी आंदोलकांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपा नेते येडियुरप्पा यांच्या घरावार दगडफेक केली. यावेळी पोलिसांकडूनही आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.
कर्नाटक सरकारने नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाबाबत दोन मोठे निर्णय घेतले. सरकारने ओबीसी मुस्लिमांसाठी ४% कोटा रद्द केला. हा ४% कोटा वोक्कलिगा आणि लिंगायत समुदायांमध्ये विभागला आहे. अनुसूचित जातींना देण्यात येणारे आरक्षण या वर्गातील विविध जातींमध्ये विभागण्यात आल्यानं बंजारा आणि भोवी समाज नाराज झाला आहे. त्यामुळे संतप्त बंजारा समाजाने माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली.त्याचबरोबर आंदोलकांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे पोस्टरही जाळले.कर्नाटकमध्ये अनुसूचित जातींमधील अंतर्गत आरक्षणाबाबत एजे सदाशिव पॅनेल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राला शिफारस करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा बंजारा समाजाने निषेध केला आहे. न्यायमूर्ती सदाशिव आयोगाच्या अहवालाच्या आधारे ही शिफारस पाठवण्यात आली आहे. ही शिफारस मागे घेण्याची मागणी आंदोलकांकडून होत आहे.
#WATCH | Karnataka: Protestors were lathicharged by the police in Shivamogga as they were protesting against the implementation of the former Justice Sadashiva Commission's report. pic.twitter.com/eEg4HmpTQ6
— ANI (@ANI) March 27, 2023
यासंदर्भात बोलताना येडियुरप्पा म्हणाले, सदाशिव अहवालासंदर्भात आंदोलकांमध्ये काही गैरसमज आहे. हे गैरसमज दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. यासंदर्भात मी लवकरच बंजारा समाजाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. दरम्यान आरक्षणाचा हा मुद्दा कर्नाटक निवडणुकीत गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.