बन्ना शेख कि रिया बर्डे ? बनावट कागदपात्राच्या आधारे भारतात आल्याने रिया बर्डेला अटक ; मित्रांच्या चौकशीत समोर आलं सत्य
एडल्ट सिनेमात काम करणारी बन्ना शेख उर्फ रिया बर्डे हिला पोलिसांनी अटक केली आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे भारतात वास्तव्य करण्यावरून पकडलं आहे. बांगलादेशातील बन्नानं बनावट कागदपत्रे देऊन भारताचं नागरिकत्व घेतले होते. पोलीस या प्रकरणी तपास करत होती. आता पोलिसांनी बन्नाला अटक केल्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. अखेर बांगलादेशी बन्ना शेख भारतात रिया बनून कशी राहत होती, तिच्याकडे भारतीय नागरिकत्वासाठी लागणारे कागदपत्रे कुठून आणि कुणाकडून मिळवली, यामागे एखादं रॅकेट आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.
बांगलादेशातील अवैधरित्या घुसखोरी करून भारतात येणारी बन्ना शेख उर्फ रिया बर्डेची कहाणी कुठल्याही फिल्मी कहाणीपेक्षा कमी नाही. बनावट कागदपत्राद्वारे भारतीय ओळख मिळवून तिने एडल्ट सिनेमात पाऊल ठेवले. बेकायदेशीरपणे भारतात राहण्यावरून पोलिसांनी जेव्हा तिला अटक केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. रियाचं खरं नाव बन्ना शेख आहे. बांगलादेशातून भारतात आलेली तिची आई अंजली बर्डे (रुबी शेख) ने पश्चिम बंगालची राहणारी असून सांगत महाराष्ट्रातील अमरावती इथल्या अरविंद बर्डेशी लग्न केले. तिने कुटुंबासाठी बनावट कागदपत्रे तयार केली त्यानंतर या कुटुंबाने नाव बदलून भारतात राहण्याचा मार्ग निवडला.
रियाची आई आणि वडील दोघेही सध्या कतारमध्ये राहतात. रियाला याआधीही मुंबई पोलिसांनी वेश्या व्यवसायाशी निगडीत गुन्ह्यात अटक केली होती. रियाचा मित्र प्रशांत मिश्राला कळाले की रिया बांगलादेशी आहे आणि ती भारतात अवैधरित्या राहते तेव्हा त्याने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून रियाला अटक केली आहे. रियाचं खरे नाव बन्ना शेख आहे, जे नाव लपवून ती रिया बर्डे आणि आरोही बर्डे नावाने ए़डल्ट फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री केली. तिच्या कुटुंबाने अमरावतीत आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट बनवले. पोर्नोग्राफी विवादाशी जोडलेल्या एका कंपनीच्या संपर्कात आल्यापासून रिया एडल्ट सिनेमात काम करू लागली. हळूहळू ती या इंडस्ट्रीत फेमस होऊ लागली.