Latest Marathi News
Ganesh J GIF

सोलापूरात मोठा धमाका; निकाल आले समोर, राम सातपुते की प्रणिती शिंदे, कोण आघाडीवर?

सोलापूर लोकसभा निवडणुकीचे निकास समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची झाली होती. महाविकास आघाडीने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना तर भाजपाने आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती.या मतदारसंघात कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता आकडेवारी समोर आली आहे.निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना १२ वाजेपर्यंत १५५२२७५ एवढी मतं मिळाली आहेत. शिंदे यांनी १५ हजार ४१८ एवढ्या मतांनी आघाडी घेतली आहे. तर भाजपाच्या राम सातपुते यांना १३९८५७ एवढी मतं मिळाली आहे.

सांगली लोकसभेच्या मैदानात ठाकरेंचा पैलवान ६४ हजार मतांनी पिछाडीवर; विशाल पाटलांनी घेतली आघाडी दुपारी १२ वाजेपर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची झाली होती. दोन्ही बाजूंनी प्रचारसभा जोरदार झाल्या होत्या. भाजपा उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सभा घेतली होती. तर शिंदे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. प्रचारसभांमध्ये महागाई, सोलापूरच्या विकासाचे मुद्दे गाजले होते.

सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी १६ हजार ८५२ मतांनी आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, विशाल पाटील यांना १००५५४ मतं मिळाली आहेत, तर भाजपाच्या संजयकाका पाटील यांना आतापर्यंत म्हणजेच सकाळी ११ वाजेपर्यंत ८३७०२ एवढी मतं मिळाली आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना १४,७४७ एवढी मतं मिळाली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारापेक्षा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना सकाळी ११ वाजेपर्यंत ८५,८०७ मतं जास्त मिळाली आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत झाली होती. काँग्रेसमधील विशाल पाटील यांनीही महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली होती, पण महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटाला सोडली. विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. दरम्यान, आता विशाल पाटील यांनी आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!