‘या’ अभिनेत्रीच्या आत्महत्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाचा मोठा निर्णय
'या' अभिनेत्याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, निकालाने आत्महत्येचे गूढ वाढले
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री जिया खान ३ जून २०१३ रोजी मुंबईतील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तब्बल १० वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणी सुरज पांचोलीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
सूरज पांचोलीवर बॉलिवूड अभिनेत्री जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास अगोदर मुंबई पोलीस करत होते आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. जिया खान आत्महत्या प्रकरणात सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एएस सय्यद म्हणाले, पुराव्याअभावी हे न्यायालय सूरज पांचोलीला दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जियाने ३ जून २०१३ रोजी मुंबईतील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. जिया खानच्या घरातून तब्ब्ल ६ पानांची सुसाईड नोट सापडली होती. त्यामध्ये जियानं सूरजवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे असे अनेक गंभीर आरोप लावण्यात आले होते. जिया खानची आई राबिया खान यांनी देखील सूरजवर काही गंभीर आरोप करण्यात आले होते. या मृत्यू प्रकरणातून सूरजची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दहा वर्षांनंतर सूरज पांचोलीला या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान सूरज पांचोली हा बॉलिवूडचा अभिनेता आहे. चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आदित्य पांचोली यांचा हा मुलगा आहे.
जिया खानला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणाचा शेवटी आज निकाल लागला आहे. पण मग माझ्या मुलीचा मृत्यू कशामुळे झाला आहे? असा सवाल जियाची आई राबिया खान यांनी म्हटले आहे.