
मोठी बातमी! अजित पवार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?
दोघेही अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री होणार, राज्यात नवीन राजकीय समीकरण, राजकीय भूकंप होणार?
नागपूर- महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येऊन चार महिने झाले आहेत. तरीही सरकारमधील रूसवे फुगवे संपलेले नाहीत.एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी राहण्याची इच्छा लपून राहिलेली नव्हती. त्यातच राजकारणात आता नवीन चर्चा सुरु झाली आहे.
काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिली आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांची अवस्था फार वाईट झाली, त्यांच्या सगळ्या योजना बंद केल्या जात आहे. त्यांच्या लोकांची सुरक्षा काढली गेली. पण भाजपच्या लोकांची आहे. त्यामुळे त्यांनी त्यातून शिकावं. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी आमच्यासोबत यावं, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्ही त्यांची काळजी घेऊ. त्याच्यात मुख्यमंत्री पदासाठी ओढ लागली आहे. आम्ही दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनवू. अजित पवार यांना काही दिवस आणि एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री बनवू”, भाजपाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो. असे मोठे विधान नाना पटोलेंनी केले आहे. महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यात अजित पवारही उघडपणे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करत असतात. त्यामुळे पटोले यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. दरम्यान असे समीकरण समोर येण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची मदत महत्वाची ठरणार आहे. पण पक्ष फुटीमुळे
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची मान्यता मिळण्याची शक्यता धुसर आहे.
यावेळी नाना पटोले यांनी फडणीसांवर टीका केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती ठीक व्हावी. ते आजकाल खूप फेकतात, त्यांनी मोदींप्रमाणे खोटं बोलू नये, आधी जे देवेंद्र फडणवीस होते, राज्यासाठी त्यांची लढाई चालायची. ते त्यांनी करावं अश्या शुभेच्छा देतो. असे नाना पटोले म्हणाले आहेत.