
मोठी बातमी! दुरावा संपवत एकनाथ शिंदे ठाकरे एकत्र येणार
मुंबई महापालिका निवडणूका एकत्र लढवणार? भाजपाला रोखण्यासाठी एकनाथ शिंदेची खेळी?,युतीत तणाव?
मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाने शत प्रतिशत भाजपाचा नारा दिला आहे. त्याचबरोबर भाजपाचे आमदार देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील वेगळी चुल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंकडे युतीसाठी हात पुढे केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी राज्यात नव्या युतीचे संकेत मिळाले आहे. विधानसभा निवडणूकीतील वाद बाजूला सारत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीचे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोघात तब्बल दोन तास चर्चा झाली. येत्या काही महिन्यात मुंबईसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुंबई पालिकेची ही पहिलीच निवडणूक होणार आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबईत ताकद जास्त आहे, हे विधानसभा निवडणुकीत दिसून आलं आहे. मुंबईत ठाकरे गटाची कामगिरी दमदार राहिली आहे. ठाकरे गटाचे २० पैकी १० आमदार मुंबईतील आहे. यावरुन ठाकरे गटाची मुंबईतील ताकद दिसून येते. त्याचबरोबर माहीम मतदारसंघात मनसे आणि शिंदे गटाच्या वादात ठाकरे गटाने येथे मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदे आणि राज ठाकरे यांची युती होण्याची शक्यता वाढली आहे. आजची भेट ही केवळ आणि केवळ सदिच्छा भेट होती असे एकनाथ शिंदे जरी म्हणाले असले, तरीही राजकीय वर्तुळात मात्र नव्या युतीचे संकेत मिळाले असल्याची चर्चा आहे.
भाजपाला विधानसभा निवडणूकीत १३२ जागा मिळाल्यामुळे भाजपा स्वबळावर लढण्यासाठी उत्सुक आहे. त्याचा फटका एकनाथ शिंदे यांनी बसू शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांची भेट घेत शिंदे भाजपावर दबाव टाकत असल्याचीही चर्चा होत आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता वाढली आहे.